Crime News

Crime News : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग धरुन रामदास पुंजाराम जाधव यांना गावठी कट्याचा धाक दाखवत खिशातील रोख रक्कम घेऊन पसार झालेला आरोपी निलकंठ मधुकर केदार यास सोनई पोलीसांनी घोडेगाव येथुन ताब्यात घेतले.

Crime News : गणेशवाडी | गणेश बेल्हेकर – सोनई पोलीस स्टेशन हद्दीतील घोडेगाव ता. नेवासा येथे दिनांक १४ नोव्हेंबर रोजी दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग धरुन रामदास पुंजाराम जाधव यांना गावठी कट्याचा धाक दाखवत खिशातील रोख रक्कम घेऊन पसार झालेला आरोपी निलकंठ मधुकर केदार यास सोनई पोलीसांनी घोडेगाव येथुन ताब्यात घेतले.
सदर गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. पोलीस अधीक्षक, राकेश ओला साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक, , मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील साहेब यांनी सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांना सदरचा गुन्ह्यातील आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले.

त्या अनुषंगाने सोनई पोलीस स्टेशनचे विशेष पोलीस पथक तयार केले. गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी निलेश उर्फ निलकंठ मधुकर केदार, रा. घोडेगाव . हा घोडेगाव येथे आल्याची माहिती मिळाल्याने पोहेकों आडकीत्ते, पोहेकाॅ गावडे, पोकाॅ पवार, पोकाॅ क्षीरसागर, पोकाॅ तमनर यांनी आरोपीचा घोडेगाव गावात सापळा रचुन शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक, राकेश ओला साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक, वैभव कलुबर्मे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, सुनिल पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक आशिष प. शेळके, पोहेकाॅ आडकीत्ते, पोहेकॉ गावडे, पोकाॅ पवार, पोकाॅ क्षीरसागर, पोकाॅ तमनर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *