अंबादास कांगुणे

ग्रंथ हे श्रेष्ठ गुरु असून लहान थोरांनी पुस्तके वाचली पाहिजेत . पुस्तक वाचकांना केवळ आनंदच देतात असे नाही तर विविध लेखकांचे विचार आपल्या जीवनात मार्गदर्शक ठरत असतात असे मत मक्तापूर गावचे ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते श्री अंबादास कांगुणे यांनी व्यक्त केले .

ग्रंथ हे श्रेष्ठ गुरु असून लहान थोरांनी पुस्तके वाचली पाहिजेत. पुस्तक वाचकांना केवळ आनंदच देतात असे नाही तर विविध लेखकांचे विचार आपल्या जीवनात मार्गदर्शक ठरत असतात असे मत मक्तापूर गावचे ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते श्री अंबादास कांगुणे यांनी व्यक्त केले .ते आज शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य नेवासा शाखेच्या फिरते वाचनालय आपल्या गावात या उपक्रमांतर्गत नेवासा तालुक्यातील मक्तापूर गावात आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होते . ते पुढे म्हणाले की वाचाल तर वाचाल ही म्हण खरी असून तिची प्रचिती घेण्यासाठी शब्दगंधने आणलेले पुस्तके ग्रामस्थानी वाचण्यासाठी घेण्याचे त्यांनी ग्रामस्थांना अवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश झगरे होते .श्री गणेश झगरे अध्यक्ष भाषणात म्हणाले की, शब्दगंधाचा हा उपक्रम नक्कीच समाजाच्या उपयोगी पडणारा असून शब्दगंधच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मक्तपूर गावात आल्याबद्दल धन्यवाद दिले . प्रथमतः शब्दगंध नेवासा शाखेचे उपाध्यक्ष श्री दिगंबर गोंधळी यांनी संबळ वाद्य वाजवून वातावरण निर्मिती केली व उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला .शब्दगंध नेवासा शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ .किशोर धनवटे यांनी सघ परिस्थितीत वाचनाचे महत्त्व विशद केले .शेवटी शब्दगंधाचे दुसरे उपाध्यक्ष श्री पांडुरंग रोडगे यांनी उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले .

या प्रसंगी ग्रामस्थ श्री नवनाथ बर्डे ,रावसाहेब बर्डे , गणेश झगरे , रामदास कांगुणे , एकनाथ लहारे , नामदेव बर्डे , अंबादास कांगुणे , दशरथ बर्डे , शिवाजी बर्डे , मजुनू शेख ,हरिभाऊ कोळेकर , दिलीप बर्डे , एकनाथ कांगुणे , रामचंद्र बर्डे , अशोक कांगुणे , महेश लहारे ,सुरेश खैरे , पोपट कांगुणे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते .

One thought on “लेखकांचे विचार जीवनास मार्गदर्शक – श्री अंबादास कांगुणे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *