Liquor

नेवासा तालुक्यातील पिचडगाव येथे अवैध दारू (Liquor) विक्री बंद करण्यासाठी महिलांनी नेवासा पोलीस स्टेशनला निवेदन दिले. पिचडगावात व्यसनाधीन झालेले पती आणि संसाराची झालेली राखरांगोळी,तसेच गावातील तरुण वर्ग पुरुष पूर्णपणे व्यसनाधीन झालेले आहे.

नेवासा – नेवासा तालुक्यातील पिचडगाव येथे अवैध दारू (Liquor) विक्री बंद करण्यासाठी महिलांनी नेवासा पोलीस स्टेशनला निवेदन दिले. पिचडगावात व्यसनाधीन झालेले पती आणि संसाराची झालेली राखरांगोळी,तसेच गावातील तरुण वर्ग पुरुष पूर्णपणे व्यसनाधीन झालेले आहे.अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे.त्यामुळे महिला आणि लहान मुले यांना मोठ्या प्रमाणावर मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

तसेच पतीचा दारू(Liquor) पिऊन येऊन रोजच्या या त्रासाला कंटाळून गावातील सर्व महिला एकत्र येऊन नेवासा पोलीस स्टेशनला निवेदन दिले.जर आठ दिवसात अवैध दारूबंदी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.
या‌ दिलेल्या निवेदनावर मीना शिंदे,ज्योती शिंदे,रूपाली शिंदे, सुमन शिंदे,सुनीता शिंदे,सुजाता शिंदे, बेबी शिंदे,मंदाबाई शिंदे,मीरा गव्हाणे, ताराबाई गव्हाणे,हिराबाई गव्हाणे, कांताबाई गव्हाणे आदी महिलांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *