Crime News

Crime News : तलवारीचा धाक दाखवत मारहाण करून लोकांना लुटणाऱ्या पाच आरोपीना श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले आहे आणि त्यांच्याकडून ५० हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे.(Crime News)

Crime News : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तलवारीचा धाक दाखवत मारहाण करून लोकांना लुटणाऱ्या पाच आरोपीना श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले आहे आणि त्यांच्याकडून ५० हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे. लवारीचा धाक दाखवत मारहाण करून लोकांना लुटणाऱ्या पाच आरोपीना श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले आहे आणि त्यांच्याकडून ५० हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे. सत्यवान दादा जाधव, गौरव महादेव नाळे,शुभम सुदाम क्षिरसागर (तिन्ही रा.अजनुज, ता.श्रीगोंदा), अरबाज बशीर सय्यद, सलीम शब्बीर बेग (दोन्ही रा.आनंदवाडी, ता.श्रीगोंदा) अशी आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर व श्रीगोंदा पोलीसांनी ही संयुक्त कारवाई केली.

याबद्दलची सविस्तर माहिती अशी कि , ३० जानेवारी रोजी निलेश नामदेव जाधव राहणार काष्टी, ता.श्रीगोंदा हे त्यांच्या साथीदारासह टेम्पो घेऊन चालले होते. यावेळी सहा इसमांनी तलवारीचा धाक दाखवत त्यांना अडवले आणि मारहाण करत त्यांच्याकडील १ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत गुन्ह्याचा तपास करुन आरोपींना अटक करण्याचे सूचित केले होते. यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिनांक ६ फेब्रुवारीला पथक तयार करून याबाबत शोध घेण्यास सुरुवात केली.

श्रीगोंदा परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वरील आरोपींनी हा गुन्हा केला आहे व ते आता अजनूज या गावात आहेत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अजनुज गावात सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले. गुन्ह्यातील गेलेल्या मालापैकी ५० हजार रुपये पोलिसांनी जप्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *