शेती

नेवासा | ज्ञानेश्वर सिन्नरकर – ग्रामीण कृषी जागरुकता व कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत भानसहिवरे येथे आलेल्या सोनई कृषी महाविद्यालयातील कृषी दुतांनी शेतकऱ्यांना मोबाईलवरील शेती अँप्सची माहिती दिली. कृषी दुतांनी शेतकऱ्यांना अॅप्सचा वापर करून शेतीचे भरघोस उत्पन्न मिळवता येईल, ॲप वर फोटो अपलोड करून रोगाची माहिती उपलब्ध करून त्यावर काय उपाययोजना करता येतील ही माहिती शेतकऱ्यांना दिली शेतीमालाचे बाजार भाव जाणून घेणाऱ्या ॲप विषयी देखील माहिती कृषीदूतांनी दिली आणि शेतीची काळजी घेण्याबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी भानसहिवरे येथील मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते, अजिंक्य लिंगायत, अजय वडणे, सुधीर लव्हाट, अनिकेत माळी, एल राजशेखर, एम गणेश उपक्रमात सहभागी झाले होते. त्यांना प्राचार्य डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य बोरूडे, समन्वयक व कार्यक्रअधिकारी डॉ.अतुल दरंदले यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *