Accident

Ahmadnagar Accident News : नगर- सोलापूर महामार्गावरील बनपिंप्री शिवारात ३१ जानेवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये २ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.(Accident)

Ahmadnagar Accident News : नगर- सोलापूर महामार्गावरील बनपिंप्री शिवारात काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये २ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला असून यामध्ये दुचाकीवरील बाळासाहेब बोरुडे (वय ५५) व बबन तरटे (वय-६०), हे दोघे जागीच ठार झाले आहेत. हे दोघे घोगरगाव येथील रहिवासी होते.(Accident)

हा अपघात ३१ जानेवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत अधिक माहिती अशी की, घोगरगाव येथील रहिवासी असलेले वरील दोघे नगरला कामानिमित्त गेले होते.सायंकाळी चारच्या सुमारास नगरहुन घोगरगावच्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीस जोराची धडक दिली. धडक जोराची बसल्याने दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले.

सायंकाळी चारच्या सुमारास नगरहुन घोगरगावच्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीस जोराची धडक दिली. धडक जोराची बसल्याने दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले.अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी श्रीगोंदा पोलिसांचे पथक तात्काळ दाखल झाले व त्यानंतर त्या दोघांचे मृतदेह श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.एकाच गावातील २ व्यक्तींचे अश्या प्रकारे अचानक निधन झाल्याची माहिती समजताच संपूर्ण घोगरगाव गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सरू होते.

One thought on “Ahmadnagar Accident News : ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू..”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *