Budget 2024

Budget 2024 : गेल्या 10 वर्षांच्या काळात विक्रमी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या असून 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याकडे हे पाऊल असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण(Nirmala Sitharaman) यांनी म्हटलंय. (Budget 2024)

Budget 2024 : भारतात विकासाच्या मोठ्या संधी असून त्या संधी युवकांना आणि देशातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करत असून येत्या काळात रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म या मुद्द्यावर आम्ही काम करणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या. देशातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरापर्यंत सुविधा कशी मिळेल याबद्दल आम्ही प्रयत्न केले. देशातील 80 कोटी जनतेला आम्ही मोफत रेशन दिलं. मोदींनी सर्व क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांच्या संधी निर्माण केल्या. 2047 पर्यंत भारताला विकसित बनवण्य़ाचा आम्हचा प्रयत्न असून त्या दृष्टीने गेल्या 10 वर्षांपासून प्रयत्न सुरू केलेत.  देशातील 25 कोटी जनतेला आम्ही गरिबीच्या खाईतून बाहेर काढण्यास आम्ही यशस्वी ठरलो असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलंय. 

निर्मला सीतारमण(Nirmala Sitharaman) यांच्या बजेटच्या भाषणातील मुद्दे(Budget 2024)

 • चार कोटी शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा
 • स्किल इंडिया मिशन अंतर्गत 1.4 कोटी तरुणांना प्रशिक्षण
 • पीएम मुद्रा योजनेंतर्गत 43 कोटी कर्ज दिले, पीएम मुद्रा योजनेंतर्गत 22.5 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले
 • तरुणांच्या सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. 3 हजार नवीन आयआयटी उघडण्यात आल्या आहेत. 54 लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. 
 • आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तरुणांनी घवघवीत यश संपादन केले आहे. 
 • तिहेरी तलाक बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे. संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणला आहे.
 • येत्या 5 वर्षांत गरिबांसाठी 2 कोटी घरे बांधली जातील, ग्रामीण गृहनिर्माण योजनेंतर्गत 2 कोटी घरे बांधली जातील, मध्यमवर्गीयांसाठी गृहनिर्माण योजनेचा विचार केला जात आहे.
 • रूफटॉप सोलर प्लॅन अंतर्गत 1 कोटी घरांना 300 युनिट/महिना मोफत वीज
 • अंगणवाडी केंद्राचा दर्जा वाढणार, ‘आशा’ कर्मचाऱ्यांना मिळणार आयुष्मान योजनेचा लाभ.
 • गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी लसीकरण वाढवले ​​जाईल, नॅनो डीएपीचा वापर सर्व क्षेत्रांमध्ये वाढवला जाईल.
 • शेतीसाठी आधुनिक साठवण, पुरवठा साखळीवर भर, सरकार मोहरी आणि भुईमूग लागवडीला अधिक प्रोत्साहन देईल, मत्स्यपालन योजनेला चालना देण्यासाठी काम केले जाईल, सागरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचे लक्ष्य आहे, सरकार 5 एकात्मिक एक्वा पार्क उघडणार आहे.
 • पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत आदिवासी समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. खास जमातींसाठी खास योजना आणली आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत. सरकार गरिबी हटवण्याचे काम करत आहे. सरकारने आव्हानांचा धैर्याने सामना केला आहे. ग्रामीण विकासाच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. 
 • शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे. 11.8 कोटी लोकांना पंतप्रधान किसान योजनेतून आर्थिक मदत मिळाली आहे.
 • 10 वर्षात उच्च शिक्षण घेणाऱ्या महिलांच्या संख्येत 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 • ग्रामीण भागातील 70 टक्के घरे महिलांना देण्यात आली. PM AWAS अंतर्गत 70 टक्के घरे महिलांना दिली.
 • सर्व प्रकारचे पायाभूत प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत. येत्या 5 वर्षांत गरिबांसाठी 2 कोटी घरे बांधली जातील. 
 • डीबीटी (DBT) च्या माध्यमातून देशातील 38 कोटी लोकांना थेट फायदा झाला. 

टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही(Budget 2024), असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. सध्या आयकर भरणाऱ्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. आता 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जात नाही. आयकर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. परतावा देखील त्वरीत जारी केला जातो. जीएसटी संकलन दुपटीने वाढले आहे. जीएसटीने अप्रत्यक्ष कर प्रणाली बदलली आहे.

One thought on “Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटच्या भाषणात मांडले ‘हे’ मुद्दे..वाचा सविस्तर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *