crime

Crime News : चोरी आणि घातपात करण्याच्या तयारीने देशी बनावटीचा पिस्तुल बाळगल्या प्रकरणी जेऊर हैबाती येथील विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे (वय 26) रा. जेऊर हैबती याला नेवासा पोलिसांनी अटक केली आहे.

Crime News | अभिषेक गाडेकर – चोरी आणि घातपात करण्याच्या तयारीने देशी बनावटीचा पिस्तुल बाळगल्या प्रकरणी जेऊर हैबाती येथील विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे (वय 26) रा. जेऊर हैबती याला नेवासा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिस कॉ. नारायण एकनाथ डमाळे (वय 33 वर्षे) यांनी दिलेल्या सरकारी फिर्यादित म्हटले आहे की, दि.19/02/2024 रोजी रात्री 11 वाजता देडगाव ते तेलकुडगाव जाणारे रोडवर देडगाव ता.नेवासा येथे आरोपी विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे रा. जेऊर हैबाती, ता.नेवासा व सुनील दिलीप चव्हाण (गाव माहित नाही) यांनी चोरी करण्याचे इरादयाने अगर घातपात करण्याचे तयारीने देडगाव ते तेलकुडगाव असे रोडने जात असतांना रात्री 11 वाजेच्या सुमारास इसम नामे विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे (वय 26) रा. जेऊर हैबती ता. नेवासा याने विनापरवाना बेकायदा वरिल वर्णनाचा व किंमतीचा देशी बनावटीचा पिस्तुल स्वत:चे कब्जात बाळगतांना मिळुन आला आहे.(Crime)

तसेच 10,000.00 रु. विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे याचे अंगझडतीत त्याचे कमरेला खवलेला एक देशी बनावटीचा पिस्तुल लोखंडी धातुचा त्याचे बटास दोन्ही बाजुने प्लॅस्टीक काळे रंगाची मुठ, पट्टीसारखा ट्रेगर असलेला जुना वापर,2 हजार रुपये किंमतीची एक पिवळ्या धातुची पिस्तुल बुलेट (जिवंत कारतुस), 15 हजार रुपये किंमतीची विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे याचे ताब्यातील एक काळया रंगाची बजाज प्लॅटीना (नंबर एमएच 17 एडी 7082) तिच्यावर पांढरे व निळया रंगाचे पटूटे, 13 हजार रुपये किंमतीची मोटार सायकल सोडुन पळुन गेलेल्या इसमाचे ताब्यातील एक काळया रंगाची हिरो होंडा स्पेलेंडर तिचा (नंबर ए एच 17 जे 4427) असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

या फिर्यादीवरुन विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे रा.जेऊर हैबाती ता.नेवासा व सुनील दिलीप चव्हाण (गाव माहित नाही)
याचे विरूद्ध नेवासा पोलीस ठाण्यात .र.नं.-159/2024 भारतीय हत्यार कायदा क. 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचे मार्गदर्शना खाली पोना श्री. घुगे हे पुढील तपास करित आहेत.

पोलीस निरीक्षक यांचे आवाहन…देशी कट्ट्याबाबत ज्या नागरिकांकडे माहिती आहे त्यांनी न भिता, न घाबरता धनंजय जाधव, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे नेवासा यांना द्यावी, नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *