Crime News – शहरापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या नारायणवाडी रोड येथे शेती असलेल्या अनिल जयराम पंडुरे यांच्या शेतात जमीनीच्या वादावरून जबरी मारहाण झाल्याची घटना घडली आहे.(Crime News)

Crime News – शहरापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या नारायणवाडी रोड येथे शेती असलेल्या अनिल जयराम पंडुरे यांच्या शेतात जमीनीच्या वादावरून जबरी मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अनिल पंडुरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आम्ही शेती करुन आमचे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो दि. 01/02/2024 रोजी पहाटे 03/00 वाचे सुमारास मा माझे शेतातील गव्हाचे पिकाला पाणी देत असताना आमचे शेजारी राहणारे इसम नामे 1) संभाजी जाधव, 2) गोकुळ संभाजी जाधव, 3) सोमा भगत 4) नवनाथ व्यवहारे 5) दादा संभाजी जाधव 6) आण्णा भांगे हे सर्व माझ्या जवळ येवुन मला तुम्ही इथे रहायचे नाही ही शेती तुमची नाही असे दमदाटी करुन सर्वांनी मिळुन आमचे शेतात असलेले बोअरवेलचे पाईप तोडुन नुकसान करुन तेथुन निघुन गेले होते. (Crime News)

दिनांक 01/02/2024 रोजी दुपारी 01/00 वाचे सुमारास मी, माझे वडील जयराम, भाऊ सुनिल व राजु तसेच आई झुंबरबाई असे आम्ही आमचे शेतात तोडुन टाकलेले बोअरचे पाहणी करीत असताना त्यावेळेस आमचे शेजारी राहणारे इसम नामे 1) संभाजी जाधव. 2) गोकुळ संभाजी जाधव, 3) सोमा भगत. 4) नवनाथ शरद व्यवहारे. 5) दादा संभाजी जाधव, 6) आण्णा भांगे हे सर्व त्यांचे हातात लोखंडी टांभी, लोखंडी गज व लाकडी दांडके असे तेथे घेवुन तुम्हाला रात्री सांगितले होते ना इथे राहायचे नाही तुम्ही ईथुन निघुन जा असे दमबाजी करीत असताना मी त्यांना समजावुन सांगण्यास गेलो असता दादा संभाजी जाधव याने हा  खुप माजला आहे.

यांना आज संपूवुन टाका असे म्हणुन दादा जाधव याने त्याचे हातात लोखंडी गज माझ्या डोक्यात, तसेच दोन्ही पायावर मारुन दुखापत केली. त्यानंतर संभाजी जाधव व गोकुळ संभाजी जाधव यांनी त्यांचे हातातील लोखंडी टांभीने माझा भाऊ नामे सुनिल पंडुरे याचे डोक्यात, हातावर, पायावर जबर मारहाण करुन दुखापत केली तसेच सोमा भगत व नवनाथ शरद व्यवहारे यांनी त्यांचे हातातील लाकडी दांडक्याने माझे वडील जयराम पंडुरे यांना त्यांचे पायावर व मारहाण करुन जबर दुखापत केली तसेच आण्णा भांगे याने माझा भाऊ राजु पाठीवर व आई झुंबरबाई यांना लाकडी काठीने मारहाण करु लागला.

त्यावेळेस माझा भाऊ राजु व आई झुंबरबाई हे तेथुन पळुन गेले आम्हाला मारहाण करणारे संभाजी जाधव आण्णा भांगे सोमा भगत हे मला व माझा भाऊ सुनिल आणि वडील जयराम यांना तुम्ही इथे रहायचे नाही तर तुम्हाला परत बघुन घेवु असे दमदाटी करुन तेथुन निघुन गेले ते माझा भाऊ सुनिल यास डोक्यास, हातास मारहाण करून निघुन गेले नंतर मी उठुन पाहिले असता व पायास गंभीर दुखापत झाल्याने मला दिसुन आले तसेच माझा भाऊ सुनिल हा बेशुद्ध अवस्थेत पडुन होता. व माझे वडील यांच्या डावे पायास गंभीर दुखापत झालेली मला दिसुन आले त्यानंतर माझी आई नामे झुंबरबाई व भाऊ राजु यांनी लोकांना जमवुन उपचाराकरीता अॅम्बुलन्सने ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे घेवुन गेले.

तेथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचार करीता सिव्हील हॉस्पीटल अहमदनगर येथे रेफर केले असुन सिव्हील हॉस्पीटल अहमदनगर येथे आम्ही सध्या उपचार घेत असुन माझा भाऊ  सुनिल, वडील जयराम, व मला मारहाण करुन जबर दुखापत करुन आम्हाला जिवे ठार मारण्याचे प्रयत्न करणारे आमचे शेजारी राहणारे 1) संभाजी जाधव. 2) गोकुळ संभाजी जाधव. 3) सोमा भगत. 4) नवनाथ शदर व्यवहारे. 5) दादा संभाजी जाधव. 6) आण्णा भांगे सर्व रा नेवासा खु ता नेवासा यांचे विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे सदर फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०७, ३२६, ३२४, ५०६, १४३, १४७, १४८,१४९,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *