प्रार्थना

घोडेगाव – घोडेगाव धर्मग्राम अंतर्गत संत योसेफ चर्च, रांजणगाव या ठिकाणी उपवासकाळानिमित्ताने मंगळवार दि. १२ मार्च ते शुक्रवार दि.१५ मार्च २०२४ अशा चार दिवसीय आध्यात्मिक आरोग्य दानाची प्रार्थना सभेचे आयोजन नियोजन घोडेगाव धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू फा. सतिश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव भाविकांनी केले होते.
दररोज सायंकाळी ६:०० ते ९:०० वाजेपर्यंत हि प्रार्थना पॉप्युलर मिशन डिव्हाईन आश्रमचे संचालक फा. थॉमस, फा. जोसेफ व सर्व आश्रमाच्या सिस्टर्स, ब्र. मिलिंद व ब्र. बोर्गे यांनी भाविकांना चार दिवस पवित्र माळेची भक्ती, पवित्र कृसाच्या वाटेची भक्ती, प्रायश्चित्त संस्कार, धार्मिक गीते, प्रबोधन, पवित्र साक्रमेंताची भक्ती, आशिर्वाद, बायबल वाचन व पवित्र मिस्साबलिदान असे या भक्तीचे कॅरिजमॅटिक पद्धतीने रोजचे नियोजन होते.

सेंट ॲनिज हॉस्पिटल च्या सिस्टर्स व सेंट जोसेफ द अपारेशन कॉन्व्हेंट सिस्टर्स, मकासरे गुरुजी, गाढवे गुरुजी यांनी देखील ह्या प्रार्थनेमध्ये भाग घेतला. रांजणगावातील भाविकांनी उत्स्फूर्तपणे या प्रार्थनेमध्ये दररोज दोनशे ते अडीचशे भाविकांनी सहभाग घेतला. भाविकांसाठी दररोज संध्याकाळच्या जेवणाची सोय रांजणगावातील धर्म ग्रामस्थांनी चर्च मध्येच केली होती. विशेष म्हणजे भाविकांनी सर्वांनी वर्गणी करून प्रत्येकाने आपल्या श्रमातून फुलनफुलाची पाकळी कुणी पैसे स्वरूपात तर कुणी वस्तू स्वरूपात ह्या कार्यक्रमासाठी मदत दिली व हा कार्यक्रम राबविला होता.

हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी संत योसेफ चर्च कमिटीचे अध्यक्ष फा.सतिश कदम, उपाध्यक्ष बाबासाहेब आल्हाट, उपाध्यक्ष रामदास जावळे, सचिव अनिल आल्हाट, सहसचिव आदेश जावळे, खजिनदार दानियल जावळे, सुधाकर आल्हाट, लहानू जावळे, विकास जावळे, लाजरस जावळे, युवक अध्यक्ष आण्णासाहेब जावळे, युवक उपाध्यक्ष शिमोन आल्हाट, महिला प्रतिनिधी अध्यक्ष आशा जावळे, उपाध्यक्ष काजल आल्हाट, सचिव शितल जावळे, चर्च सेवक बाळासाहेब आल्हाट यांनी फार परिश्रम घेतले. छायाचित्रण व बातमी लेखन पिटर बारगळ सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *