नोटरी

नेवासा | अभिषेक गाडेकर – भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयामार्फत नोटरी पब्लिकपदी अॅड. रवींद्र चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. गेली २० वर्षांपासून ते वकिली व्यवसाय करत आहेत. दिवाणी, फोजदारी, रेव्हेनू, लेबर व इतर कोर्टात कामाचा मोठा अनुभव आहे. समाजाशी जिव्हाळ्याचे नाते त्यांनी जोपासले आहे. सर्वसामान्य व मागासवगीय लोकांची कामे त्यांनी मोफत केली आहेत.

सामान्य लोकांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी लाचलुचपत विभागामार्फत हिसका दाखवला आहे. सोनईतील तिहेरी खून खटला प्रकरणात सरकारी वकील उज्वल निकम यांच्या विरोधात बचाव पक्षाचे वकील म्हणून अॅड. रवींद्र
चौधरी म्हणून काम पहिले. नोटरी पब्लिकपदी अॅड. चौधरी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा खासदार सुजय
विखे पाटील यांनी सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *