स्वामी समर्थ

बेलपिंपळगाव | विलास धनवटे नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे गुरुवारी श्री स्वामी समर्थ मंदिराचा सातवा वर्धापन दिन सोहळा भास्करगिरी महाराज श्री क्षेत्र देवगड, प्रकाशानंदगिरी महाराज, स्वामी विश्वनाथगिरी महाराज यांच्या मार्गदर्शन खाली साजरा करण्यात येणार आहे. पहाटे 4 ते 7लघुरुद्र अभिषेक,7:30 ते 8 महाआरती, त्या नंतर भव्यदिव्य पालखीपूजन व मिरवणूक होईल. त्यानंतर स्वामी विश्वनाथगिरी महाराज यांचे प्रवचन होईल, त्या नंतर महाप्रसाद होईल, दुपारी 1 ते 3 सद्गुरू दासदिगंबर स्वामी (गावखडी रत्नागिरी ) यांचे प्रवचन होईल,दुपारी 4ते 6 प्रा डॉ गजानन महाराज वाव्हळ पुणे यांचे कीर्तन होईल.

त्या नंतर महाप्रसाद होईल सायंकाळी 7:30 वा महा आरती होईल त्या नंतर रात्री फटाक्यांची आतिषबाजी होईल रात्री भजन कार्यक्रम होईल या कार्यक्रम साठी मंदिराला आकर्षक फळ, फुल, लाइटिंग याने सजवलं आहे या कार्यक्रम साठी जिल्ह्यातील हजारो भाविक भेट देतात या ठिकाणी गेल्या सात वर्ष झाली प्रत्येक गुरुवारी अविरत पणे अन्न दान सुरु आहे आणि भविष्यात पुढे पाच वर्ष चे अन्न दान बुक आहे प्रत्येक गुरुवारी 3हजार वर भाविकांना या ठिकाणी अन्नदान असते तरी या कार्यक्रम चा लाभ घ्यावा असे श्री स्वामी समर्थ महाराज सेवेकरी व ग्रामस्थ यांनी विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *