भास्करगिरी महाराज

नेवासा | मंगेश निकम तालुक्यातील प्रवरा संगम येथे मानाच्या पावन गणपती मूर्तीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा श्रीक्षेत्र देवगड येथील गुरुवर्य ह भ प भास्करगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते सकाळच्या मंगलमय वातावरणात करण्यात आली. या धार्मिक कार्याला टोका प्रवरासंगम माळीवाडी व वाशिम खेडले काजळी ग्रामस्थांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. श्रीक्षेत्र देवगडचे मठाधिपती गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांचे प्रवचन झाले प्रवचनामध्ये गणपतीचे सर्व कार्यासाठी शुभारंभ प्रसंगी आवर्जून पूजा केली जाते कारण श्री गणेश ओंकार स्वरूपात आहे समाजामध्ये धार्मिक गोष्टी सकारात्मक विचारासाठी वाढीस लागणे आवश्यक आहे असे प्रतिपादन भास्करगिरी यांनी केले.

आशीर्वाद लाभ देताना त्यांनी समाजाकडून अपेक्षा व्यक्त केली की सर्व जाती धर्माच्या बांधवांनी एकत्र येऊन गावांमध्ये रस्ते मंदिरे व शाळा यासारख्या इमारती नवीन पद्धतीने उभ्या कराव्यात विशेषता ग्राम स्वच्छतेला सर्वांनी एकत्र येऊन एकोपा दाखवावा सार्वजनिक कार्य एकत्र करावे व गावाला गाव पण द्यावे विचाराचे मतभेद असली तरी सर्वांनी गावासाठी एकत्रित काम करून एकोपा निर्माण करणे आवश्यक आहे प्रवरा संगम येथे अतिशय भव्य व सुंदर नक्षीकाम केलेले मानाच्या पावन गणपतीचे मंदिर उभारण्यात आले आहे यासाठी सर्वांनी उत्तम सहकार्य केल्याबद्दल माजी सरपंच सुनील बाकलीवाल यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *