कृषि

नेवासा | ज्ञानेश्वर सिन्नरकर तालुक्यातील भानसहिवरे येथे कृषि महाविद्यालय सोनई येथील कृषिदुतांनी ड्रोनद्वारे कीटकनाशकांच्या फवारणीचे प्रात्यक्षिक तसेच जैविक खतांचा वापर या विषयावर चर्चासत्राचे आयोजन दि. १४ मार्च २०२४ रोजी श्री.भणगे पुंजाराम ज्ञानदेव यांच्या शेतात करण्यात आले होते. सदरील प्रात्यक्षिकावेळी भानसहिवरे परिसरातील शेतकरी खुप मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी तहसीलदार नेवासा माननीय डॉ.संजय बिरादार हे होते. तर व्‍यासपीठावर सरपंच किशोरभाऊ जोजार, उपसरपंच दत्तात्रय काळे, महंत अवेराज बाबाजी आराध्य,बाबासाहेब भणगे,जनार्धन जाधव डॉ.अतुल दरंदले, डॉ. अविनाश काकडे, प्रा.श्रीकृष्ण हुरुळे,आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात तहसीलदार नेवासा मा.डॉ.संजय बिरादार म्‍हणाले की, शेतकऱ्यांनी नवीन कृषि तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी तसेच विविध उपाययोजना राबविण्‍यादृष्‍टीने कृषि विभाग व विद्यापीठाच्‍या वतीने विशेष अभियान सुरू असुन या अभियानात कृषिच्‍या विद्यार्थ्‍यींनी आपले योगदान द्यावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रम अंतर्गत झालेल्या प्रथम तांत्रिक सत्रात कृषि महाविद्यालय सोनई येथील डॉ.अतुल दरंदले, यांनी महाविद्यालयामध्ये चालत असलेल्या विविध प्रकल्पांची जसे माती परीक्षण साठी सुसज्ज अशी प्रयोगशाळा, जिवाणू खते प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प, रोपवाटिका, यांची माहिती दिली व महाविद्यालयात भेट देण्याच्या आवाहन केले.

डॉ. अविनाश काकडे सरांनी कृषि क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर या विषयावर सखोल मागर्दर्शन केले. व्दितीय तांत्रिक सत्रात कृषी महाविद्यालय सोनई येथील प्रा.श्रीकृष्ण हुरुळे सरांनी जैविक खतांचा वापर यावर मार्गदर्शन करून सेंद्रिय कर्ब, सुक्ष्म अन्नद्रव्य फवारणी, ड्रोन फवारणीचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजिंक्य लिंगायत यांनी केले तसेच आभार प्रदर्शन कृषिदुत अजय वडणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *