गळनिंब

नेवासा | अभिषेक गाडेकर तालुक्यातील गळनिंब जि प प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन दिनांक 11मार्च 2024 रोजी संध्याकाळी सात ते अकरा या वेळेत पार पडले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना आपल्या नृत्य, अभिनय, नाटिका याद्वारे मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे उद्घाटन नेवासा पं स माजी सभापती अशोकराव शेळके.जि.प.सदस्य दादासाहेब (पिंटूशेठ) शेळके, हरिभाऊ शेळके (शिवसेना उपनेते अहमदनगर),गटशिक्षण अधिकारी – शिवाजीराव कराड,केंद्रप्रमुख – उत्तमराव फंड यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान गावच्या सरपंच सौ.कुसुमताई बाळासाहेब खर्जुले यांनी भूषविले कार्यक्रमाचे प्रास्तविक – भारत गवळी यांनी केले.

या कार्यक्रमास उपसरपंच – विजय घावटे ग्रामपंचायत सदस्य,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्य,विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन,संचालक तसेच मोठ्या प्रमाणात पालक व माता-पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.प्रेक्षकांमध्ये महिला भगिनींचे प्रमाण सर्वात जास्त होते.या कार्यक्रमातून मिशन आपुलकी अंतर्गत पालकांनी शाळेसाठी भरघोस अशी आर्थिक मदत केली.कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरली ती कु.तेजस्विनी आंबादास शेळके ही विद्यार्थीनी.तिच्या नृत्यकलेने सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी पवार व गायत्री शेळके या दोन विद्यार्थीनिने केले. या कार्यक्रमासाठी शिक्षक अंबादास शेळके व दिपाली जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले तर यांना शिक्षक अशोक मोरे,भानुदास धाडगे,मोहनिराज थोरात,शरद खरात,यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापक – दिपक जाधव यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी नेवासा तालुक्यातील विविध भागातून शिक्षकांनी व मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली व विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *