पुरस्कार

बालाजी देडगाव | अभिषेक गाडेकर – नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे होत असलेल्या महाराष्ट्रातील भव्य दिव्य संत रोहिदास महाराज जयंती उत्सवानिमित्त आयोजित सोहळ्याच्या निमित्ताने रविवारी (१७ मार्च) या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक भारत कांबळे सर यांनी दिली. ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील श्री संत रोहिदास महाराज ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असतात. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून महंत हभप काशिनाथ महाराज गणेशगड नागतळा, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे, तान्हाजीभाऊ जाधव, चारुदत्त वाघ, नगरसेवक सुनील त्रिंबके, माजी नगरसेवक अशोक कानडे, स्वप्निल कुंजीर, संजूभाऊ डोळसे, सुनील परदेशी, भाऊसाहेब फोलाणे, बाबासाहेब पवार, चंद्रकांत मरकड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पुरस्काराबद्दल पत्रकार बन्सीभाऊ एडके यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *