कोळी महासंघ

घोडेगाव | दादा दरंदले – आदिवासी कोळी महासंघाच्या नेवासा तालुका पदी नुकतीच घोडेगाव ग्रामपंचायत चे सदस्य आकाश टेमकर उर्फ पप्पू टेमकर यांची निवड करण्यात आली असून त्यांना या निवडीचे पत्र घोडेगाव येथे जिल्हाध्यक्ष किशोर वाटाडे यांच्या हस्ते देण्यात आले. नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील घोडेगाव ग्रामपंचायतचे सदस्य व पप्पू टेमकर यांची आदिवासी कोळी महासंघाच्या तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

या वेळी जिल्हाध्यक्ष किशोर वाटाडे उपाध्यक्ष फकीरचंद फुणगे सुनील पवार प्रमोद पवार अण्णासाहेब फुणगे अरुण टेमकर दत्तात्रय टेमकर वसंतराव सोनवणे भाऊराव जाधव अविनाश येळवंडे विष्णू चौधरी संतोष पवार गौरव जाधव किरण जाधव प्रशांत कुलकर्णी उपस्थीत होते. दरम्यान जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष तसेच पत्रकार दादा पाटील दरंदले यांचे मनोगत व्यक्त झाले यावेळी पप्पू टेमकर यांनी बोलताना सांगितले की जिल्हा कार्यकारणी ने माझ्यावर विश्वास दाखवत मला तालुका अध्यक्षपदी काम करण्याची जी संधी दिली त्या बद्दल मी त्यांचे आभारी आहे व मी येणाऱ्या काळात नेहमी समाजहिताच्या कामासाठी तत्पर राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *