महिला दिन

नेवासा | सुधीर चव्हाण – नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउददेशीय शिक्षण संस्थेत जागतिक महिला दिनानिमित्त आहार तज्ञ श्रीमती माधुरीताई ठोंबरे यांचे पौष्टिक आहार आणि सदृढ आरोग्य विषयी मार्गदर्शन व नारी शक्तीचा गौरव सोहळा पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी सरस्वती पूजन करुन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ.रंजनाताई बेल्हेकर आहार तज्ञ माधुरीताई ठोंबरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येऊन नारी गौरव सोहळयाचा शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी बेल्हेकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश पाटीलबा बेल्हेकर हे होते.

यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी अनंत जोशी, अभिषेक बेल्हेकर,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुरबट सर, पी.व्ही.बेल्हेकर आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ. भालसिंग,पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य हेमंत अहिरे, ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य भैरवनाथ तांबारे, ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य काकासाहेब वाल्हेकर, शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य स्वाती वाघे, एम.बी.ए.कॉलेजचे प्राचार्य लोसरवार सर, ऑफिस सुप्रेटेनड न्स शिवनारायण वाघे, अजित तांबे, मनोज माने,विभाग प्रमुख अमोल विघे,विभाग प्रमुख संगीता हापसे उपस्थित होते. शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती स्वाती वाघे यानी प्रास्ताविक केले. यावेळी संचालिका डॉ.रंजनाताई बेल्हेकर यांच्या हस्ते सुप्रसिद्ध आहार तज्ञ श्रीमती माधुरी ठोबरे यांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील विद्यार्थी व विविध कॉलेज मधील विद्यार्थिनींनी सांस्कृतिक व मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच विविध भाषणामधून स्री शक्तीचा जागर करण्यात आला.

यावेळी बोलताना माधुरीताई ठोंबरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना संतुलीत आहार व व्यायाम तसेच आरोग्य विषयी प्रगल्भ असे मार्गदर्शन केले व महिलांनी दैनंदिन जीवनात इतरांची जशी काळजी घेतात तसेच स्वतः ची काळजी घ्यावी,यासाठी त्यांनी नियमित आहार व योगा, व्यायाम करावा असे आवाहन केले. शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ.रंजनाताई बेल्हेकर यांनी आपल्या भाषनातून स्री ने प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उतुंग अशी भरारी घेतलेली असल्याने स्त्री शक्तीचा जागर म्हणून नारी गौरव सोहळयाचे आयोजन करण्यात आले असून राजमाता जिजाई माँसाहेब,सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आता स्त्री शक्तीने प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन यावेळी बोलताना केले.

यावेळी झालेल्या नारी शक्ती गौरव सोहळयाच्या प्रसंगी श्रीमती अश्विनी गायकवाड,रविंद्र आदमाने, बापूसाहेब नवथर,गणेश निकम,प्रविण जाधव,प्रतिक देवकर,महेश भणगे,ऋतिक ठोकळ,रमेश राठोड,नितीन उबाळे,विशाल जैन,विकास खंडागळे, कु.मयुरी निपुंगे, कु. कविता पेटे, विद्या मरकड, प्रियंका द्विवेदी,महेश फडतळे, अविनाश काळे, रामेश्वर उगले, सोनवणे,नाथाभाऊ शिंदे, अजित  खुळे, गणेश अंबाडे, संजय बर्वे,दत्ता पाटील,सुनीता कराड, सदाशिव वाहुरवाघ,मयुरी नेटके, कोमल जाधव, वैशाली साळवे या सर्व शिक्षकानी सोहळा यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.अमोल विघे व नानासाहेब गायकवाड यांनी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *