पावन गणपती

नेवासा | सुधीर चव्हाण : नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील मानाच्या पावन गणपतीच्या मूर्तीची रविवारी दि.१७ मार्च रोजी देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या हस्ते सकाळी १०.३० च्या सुमारास स्थापना व प्राणप्रतिष्ठा होत आहे या निमित्ताने दोन दिवशीय धार्मिक  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने प्रवरासंगम येथे सुंदर आकर्षक असे दक्षिणात्य शिल्प कलेच्या धर्तीवर गणेश मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.पुरातन असलेल्या गणपतीची मानाची मूर्ती कोरीव कामाने अजून सुंदर व आकर्षित करण्यात आली आहे.

गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी हातभार लावल्याने सुंदर आकर्षक असे गणपती मंदिर तयार झाले आहे यासाठी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांची प्रेरणा व वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.मानाच्या पावन गणपती मूर्ती स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळयाच्या निमित्ताने शनिवारी दि.१६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता श्रींची ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक निघणार आहे त्यानंतर मूर्तीसमोर पुण्याह वाचन,मातृका पूजन,नांदी श्राद्ध असे विविध धार्मिक कार्यक्रम वेदमंत्राच्या जयघोष होतील.सायंकाळी ६ ते ८ यावेळेत रामगड संस्थानचे महंत हभप बाळकृष्ण महाराज दिघे यांचे कीर्तन व नंतर महाप्रसाद होईल.

रविवारी दि.१७ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता स्थापित देवता,प्रा:तकाल पूजन,मुख्य देवता पर्याय होम, न्यास बलिदान असे धार्मिक कार्यक्रम होईल त्यानंतर सकाळी १०.३० वाजता देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज हस्ते पावन गणपती मूर्तीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा होणार असून होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळयाच्या निमित्ताने दर्शनाचा व त्यानिमित्ताने होणाऱ्या महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रवरासंगम,टोका,माळेवाडी यांच्यासह पंचक्रोशीतील गणेश भक्तांसह ग्रामस्थांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *