पुरस्कार

नेवासा | राजेंद्र वाघमारे – जनजागृती सेवा संस्था गेली तीन वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहे,त्याच अनुषंगाने संस्थेचा तृतीय वर्धापनदिन१०मार्च रोजी अजय राजा हाॅल,बदलापूर(प)येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मश्री श्री.गजानन माने यांनी उपस्थितीतांना सामाजिक कार्याची गरज किती आहे याची जाणीव करुन दिली.आणि जनजागृती सेवा संस्थेद्वारे सामाजिक क्षेत्रात कार्य करणा-या व्यक्तींचा सन्मान करण्याच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.टीटवाळा येथील श्री महागणपती हाॅस्पिटलचे चिफ ऑपरेटींग ऑफीसर विक्रांत बापट यांनी वैद्यकीय क्षेत्रातील बिकट परिस्थितीवर लक्ष टाकतानाच वैद्यकीय सुधारणा राबविण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.

याची उपस्थितांना गरज आहे, याची जाणीव करुन दिली.महाराष्ट्र अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघाचे अध्यक्ष प्रदीप जोशी यांनी आपल्या भाषणात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा-या स्त्रिया आणि गृहीणी म्हणून प्रत्येक पुरुषाला पाठींबा देणा-या स्रियांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले.राष्टपती पदच विजेते आणि समता साहित्य अकादमीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दिलीप नारकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अतिशय छोट्या कालावधीत संस्थेने राबविलेल्या अनेक उपक्रमांचे विशेष कौतुक केले.त्याचबरोबर अशा सामाजिक उपक्रमांमध्ये तरुणांचा सहभाग वाढायला हवा यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत असे प्रतिपादन केले.

सदर कार्यक्रमास मुलाखतकार व मुंबई आकाशवाणी केंद्राच्या निर्मिती सहाय्यक हर्षदा प्रभू,उद्योजक व समाजसेवक खलील शिरगावकर,अभिनेता व लेखक-दिग्दर्शक महेश्वर तेटांबे,अभिनेत्री गीता कुडाळकर,शिर्के जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल शिर्के इत्यादी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.यावेळी राज्यातील उत्तम कार्य करणा-या संस्थांना”राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार”मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.तसेच महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या व्यक्तींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते “राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार”देऊन गौरविण्यात आले.प्रथम संस्थेच्या सचिव यांनी संचिता भंडारी यांनी प्रास्ताविक केले.व संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बदलापूर येथील ध्रुव अकॅडमिचे संचालक श्री.महेश सावंत यांनी केले. व आभार प्रदर्शन संस्थेचे खजिनदार दत्ता कडुलकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनजागृती सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच श्रुती उरणकर,एकनाथ गायकर,सचिन भंडारी,प्रसाद उकार्डे,सौरभ टकले,शुभंम नेटके,तेजल उकार्डे,सार्थक भंडारी,उत्तम नेटके,गंधाली तिरपणकर,समर्थ भंडारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *