मराठा

नेवासा | सुधीर चव्हाण – अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाच्या वतीने उत्तर नगर जिल्हयातील  पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप नेवासा येथे झालेल्या पदग्रहण सोहळयात करण्यात आले. नेवासा येथील हॉटेल प्रणाम च्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवासा वकील संघाचे माजी अध्यक्ष अँड.अशोकराव करडक हे होते तर अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद गुळभिले,राज्य प्रवक्ते प्रा.चंद्रसेन कोठावळे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप पोटे,महिला आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्ष सौ.सपनाताई कदम,सचिव जी.के. गाडेकर,मराठवाडा विभाग अध्यक्ष डॉ.रंगनाथ काळे, संस्थापक कार्याध्यक्ष सतीश पवार,नगर उत्तर जिल्हाध्यक्ष अनिल पाटील ताके,अरुणराव काकडे,महिला आघाडी उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सौ.नीता हासे,महिला आघाडी कार्याध्यक्षा उज्वलाताई शिंदे,नेवासा तालुका अध्यक्ष भारत बेल्हेकर,तालुका उपाध्यक्ष बद्रीनाथ चिंधे पाटील, नेवासा शहराध्यक्ष अँड.संदीप शिंदे,प्राचार्य नितीन धस सर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी जिजाऊ वंदना गाण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सौ.नीलिमाताई वाबळे,महिला आघाडी शहराध्यक्ष सौ.जयश्रीताई शिंदे यांनी औक्षण करून आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले.तर नवनिर्वाचित  उत्तर जिल्हाध्यक्ष अनिल ताके पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात  कुणबी मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी आम्ही सर्वजण एकत्रित आलो असून आता समाज बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी खेडोपाडी शाखा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी नेवासा श्रीरामपूर, संगमनेर,कोपरगाव, राहाता,अकोले तालुक्यातून आलेल्या पुरुष,युवक व महिला  नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शाल बुके व नियुक्ती पत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.नेवासा शहराध्यक्ष अँड.संदीप शिंदे यांनी अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाच्या वतीने आपल्याला न्याय हक्कासाठी लढा उभारायचा असल्याने पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी समजून महासंघाकडून आलेल्या सूचनांनुसार काम करावे असे आवाहन यावेळी बोलताना केले. यावेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद गुळभिले राज्य प्रवक्ते प्रा.चंद्रसेन कोठावळे,पुणे आघाडी महिला अध्यक्ष सौ.सपनाताई कदम,डॉ.रंगनाथ काळे कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड.अशोकराव करडक यांनी मराठा कुणबी महासंघाचा लढा आपल्या मुलाबाळांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाचा रहाणार असून त्यासाठी एकजुटीने काम करा,संघटन मजबूत करा एकमेकांमध्ये सुसंवाद ठेऊन संघटनेची ताकद वाढविण्यासाठी पुढे या असे आवाहन केले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले तर कुणबी मराठा महासंघाच्या नेवासा शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.जयश्रीताई शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या राज्य गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.पदग्रहण कार्यक्रमाला उत्तर नगर जिल्ह्यातील पुरुष,युवक व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *