Crime News

Ahmednagar Crime News : अहमदनगर जिल्ह्यातून मागील काही दिवसांत अनेक गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत आहेत. आता एका शेतकरी तरुणावर सपासप वार करत निर्घृण खून करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime News)

Ahmednagar Crime News : अहमदनगर जिल्ह्यातून मागील काही दिवसांत अनेक गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत आहेत. आता एका शेतकरी तरुणाचा सपासप वार करत निर्घृण खून करण्यात आला आहे ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी मध्ये घडली आहे. या तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. योगेश शेळके असं मृत तरुणाचे नाव असून तो ३५ वर्षांचा असल्याची माहिती मिळाली आहे. योगेश हा शेती करत असे. हा खुनाचा थरार रात्री ३ च्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ४ अज्ञात व्यक्ती योगेशच्या घरात घुसत त्यांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याचा गळा चिरला अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समजली आहे.(Crime News)

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शेतकरी तरुणाचा खून नेमका कोणी केला? याबाबत अजून स्पष्टोक्ती नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.(Crime News) पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली असता हत्या करणाऱ्यांनी तोंडाला रुमाल बांधला असल्यामुळे त्यांची ओळख पटली नाही, असे शेजारील रहिवाशांनी पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी पाहणी केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मागील काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात अनेक गुन्हेगारीच्या घटना घडताना दिसत आहेत. पोलीस प्रशासन यावर कारवाई करत आहे परंतु तरीही खुनासारख्या घटना सतत घडत असल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. वरील घटनेमुळे बेलवंडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे राहुरी तालुक्यातील वकील दांपत्याच्या हत्येची घटना ताजी असतानाच अहमदनगर जिल्ह्यात लगेचच आजून एक खुनाचे प्रकरण घडले आहे.

One thought on “Ahmednagar Crime News : धारदार शस्त्राने वार करत शेतकरी तरुणाची निर्घृण हत्या; रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह..”
  1. […] Ahmednagar Crime News : धारदार शस्त्राने वार करत शेत… Crime News : मी शूद्धीवर आले आणि पहिले तर तो माझा बलात्कार करत होता… २१ वर्षीय मुलीने सोशल मिडीयावर शेअर केला घडलेला प्रकार.. […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *