मनोज हारदे

नेवासा | ज्ञानेश्वर सिन्नरकर : नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथे रहिवासी असलेले तसेच नेवासा वकील संघटना बार असोसिएशनचे सदस्य एडवोकेट मनोज हारदे यांची सरकारी नोकरी पब्लिक पदी निवड झाली आहे.

त्यांचा सरकारी नोटरी पब्लिक पदाच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे त्यांची नेवासा तालुक्यामध्ये नावलौकिक वकील म्हणून ओळखले जाते तरी त्यांच्या निवडीने सर्वच स्तरातून अभिनंदन चा वर्षा होत आहे.

त्यामध्ये नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार तसेच माजी मंत्री शंकरावजी गडाख यांनी आपल्या पत्राद्वारे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच याप्रसंगी नेवासा वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट अशोकराव कर्डक, वडाळा भैरोबा गावचे सरपंच ललित मोठे पाटील एडवोकेट नानासाहेब मोठे, सिद्धांत सीड्स चे संचालक किशोर नवले, जिल्हा सीड्स अँड फर्टीलायझर्स चे अध्यक्ष सतीश मनोज आणि उपाध्यक्ष योगेश सोनवणे, नेवासा तालुका कृषी सेवा केंद्राचे अध्यक्ष प्रवीण सावंत,साई गणेश उद्योग समूहाचे संस्थापक श्री शिवाजीराव भुसारी यांनीही त्यांच्या अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *