दूध

गणेशवाडी | गणेश बेल्हेकर – दुधाचे दर सातत्याने घसरत असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या नैराश्याचे भावना निर्माण झाली आहे खाद्याचे दर , ओला व सुका चारा यांचे दर गगनाला भिडले आहे. या सर्वांचा ताळमेळ घालवताना दूध उत्पादक शेतकरी मात्र मेटाकुटीस आला आहे. दुग्ध विकास मंत्री नगर जिल्ह्यातील असून सुद्धा याचा फायदा दूध उत्पादकांना होताना दिसत नाही .हे होत असताना शेतकऱ्याकडून घेणाऱ्या दुधाचे दर मात्र कमी मात्र तेच दूध संघाकडून पॅकिंग पिशवीमध्ये विकताना त्याचे दर मात्र आहे तसेच आहेत. त्यामुळे यामध्ये दूध उत्पादक शेतकरीच भरडला जात आहे .दुधाचे दर कमी झाले तर पॅकिंग पिशवीचे दर सुद्धा कमी व्हायला पाहिजे मात्र हे होतांना दिसत नाही.

शेतकऱ्यांच्या दुधाला दर कमी देऊन यातून सरकार काय साध्य करू पाहत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी सुर दिसून येत आहे .वाढती महागाई याचा विचार करता शेतकऱ्याच्या पदरी काहीच पडत नाही. दुग्धजन्य पदार्थ पॅकिंग दुधापासून तयार केलेली पावडर यांचे दर आहे तशेच आहेत . शेतकऱ्याकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाचे दर मात्र घटले आहेत असे का? अनुदान मिळाल्यावर तरी पदरी काहीतरी लागेल अशी अपेक्षा होती. परंतु कागदी घोडे नाचताना दूध उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती केवळ निराशाच. आदर्श आचारसंहिता लागू होण्याची वेळ आली तरी आचारसंहिता लागू होण्याआधी काहीतरी निर्णय होऊन शेतकऱ्यांच्या पदरी काहीतरी पडेल अशी अपेक्षा होती.

ती अपेक्षा आता फोल ठरताना दिसत आहे .उन्हाळ्याच्या तोंडावर तरी दुधाला बरे भाव मिळतील अशी अपेक्षा होती मात्र सरकारकडून शेतकऱ्याचा हिरमोड झाला. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे भावना निर्माण झाली दूध उत्पादकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. बळीचा बकरा बनवलेल्या या बळीराजाला अजून किती बळी जाणार आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *