Bigg Boss 17

Bigg Boss 17 Winner 2024 : ‘बिग बॉस 17′(Bigg Boss 17) शोची ट्रॉफी कोणाच्या नावावर होणार याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली होती आणि अखेर सलमान खान याने मुनव्वर फारुकी याला विजेता म्हणून घोषित केल आहे.. ट्रॉफी जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे ट्रॉफी डोंगरीत आली, असं म्हणत त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Bigg Boss 17 Winner 2024 : ‘बिग बॉस 17’ शोच्या विजेत्याचं नाव घोषित झालं आहे. मुनव्वर फारुकी याने ‘बिग बॉस 17’(Bigg Boss 17) ची ट्रॉफी जिंकली आहे. तर अभिषेक कुमार रनर-अप ठरला आहे. तब्बल 105 दिवसांनंतर मुनव्वर फारुकीचा बिग बॉसमधील प्रवास संपुष्टात आला आहे. दिनांक २९ जानेवारी रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ग्रँड फिनालेला सुरुवात झाली होती. टॉप 5 मध्ये असलेल्या अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी या स्पर्धकांपैकी अरुण माशेट्टी आणि अंकिता लोखंडे यांचा प्रवास आधी संपुष्टात आला.

त्यानंतर अंतिम लढत मन्नारा, मुनव्वर आणि अभिषेक या तिघांमध्ये होती. त्यापैकी मन्नारालाही बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं. मुनव्वर या सिझनचा विजेता ठरला असून त्याला 50 लाख रुपये बक्षिसाची रक्कम मिळाली आहे. विनोदवीर असं नाव भेटलेल्या मुनव्वरचे सध्या सोशल मीडिया चर्चा सुरु आहे आणि चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विजेत्या मुनव्वरला त्याच्या वाढदिवशी चाहत्यांनी मोठं गिफ्ट दिलं आहे. आता ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

‘बिग बॉस 17′(Bigg Boss 17)च्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर मुनव्वर फारुकीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मीडियाशी बोलताना मुनव्वर म्हणाला,”मी कोणाच्या द्वेषाचं तर कोणाच्या हसण्याचं कारण झालो आहे. चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली आहे. त्यांच्यामते मी आता स्टार झालो आहे. ‘बिग बॉस’च्या या प्रवासामुळे माझं आयुष्य बदललं आहे. वाढदिवशी मला मिळालेली ही सर्वोत्कृष्ट भेट आहे. ही भेट मी माझ्या चाहत्यांना समर्पित करतो. या रोलरकोस्टर प्रवासात चाहते त्याच्या पाठीशी उभे राहिले आहेत. मी कधी बिग बॉसमध्ये सहभागी होईल तेथील आव्हानांचा सामना करेल, असं मला कधी वाटलं नव्हतं”. मुनव्वर पुढे म्हणाला,बिग बॉस’च्या घरातील समस्यांपासून कोणीही पळ काढू शकत नाही. बिग बॉसने(Bigg Boss 17) मला माझ्यातली क्षमता दाखवून दिली आहे. मला योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल सलमान खान आणि करण जोहरचे आभार. शेवटपर्यंत मी चाहत्यांचं मनोरंजन करत राहणार आहे. अभिमानाने मी ट्रॉफी डोंगरीत आणली आहे.

मुनव्वर फारुकीने ट्रॉफी आणि सलमान खानसोबतचा (Salman Khan) एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो खूपच आनंदी दिसत आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,”तुम्हा चाहत्यांचे खूप-खूप आभार. तुमचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे ‘बिग बॉस’ची ट्रॉफी डोंगरीत आली आहे. सलमान खानचे विशेष आभार. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य नव्हतं. सर्वांचे मनापासून आभार”. मुनव्वरच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.विजेता ठरलेल्या मुनव्वरला ट्रॉफीसह 50 लाख रुपये आणि आलिशान कार भेट म्हणून मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *